Tuesday, 23 October 2018

शेती हा उत्तम व्यवसाय

भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील 75 टक्के जनता खेडेगावांमध्ये वास्तव्य करत आहे. सध्या देशातील शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आहे अन्नधान्याचे दर नेहमी असतील व शंभर टक्के वापर यांच्या अखत्यारीत असतात त्यामुळे कधी साखर वीस रुपये किलो घ्या तर कधी 60 रुपये किलो आणि भाजी कधी साठ रुपये ५रूपये किलोग्रॅम अशी अवस्था सध्या आहे हीच अवस्था अन्नधान्य बाबतीत सुद्धा आहे अशा अस्थिरतेमुळे नेहमी शेतकरी आर्थिक विवंचनेत असतो
भारतातील शेतकरी वर्ग अशिक्षित पारंपारिक शेती करणारा धर्मभोळा कर्मकांडांमध्ये रमणारा त्यातच भरीत भर राजकारण व आता टीव्हीच्या बसल्या व संस्कृत मालिकांमध्ये अडकून पडला आहे ह्या व अशा अनेक कारणांमुळे शिक्षणाकडे लक्ष किंवा त्यास महत्त्व दिले जात नाही त्यामुळे आर्थिक नियोजनाचा संबंध येत नाही आणि नेमक्या याच कारणामुळे शेती अडचणीमध्ये आली आहे
शेतीमध्ये काही मिळत नाही अस्थिरता नाही अशी समजूत असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्धवट शिकलेली मुले मोलमजुरीसाठी शहराकडे वळू लागली आहेत म्हणून शबडा च्या अभावामुळे शेतीच्या अडचणी पुन्हा जास्तच वाढल्या आहेत.
      भारतातील शेती व निसर्गावरच अवलंबून आहे या ऋतुमान    मानसून यावर्षी तिचे पिकाचे सर्व काही अवलंबून आहे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत व त्यातून जमीन कसण्याची पद्धत भरपूर मनुष्यबळ कमी मानसिक ताणतणाव एकच काम वाटणीस येते पर्यायी मनुष्यबळाची हमी यामुळे चांगल्या पद्धतीने शेती केली जात नाही.पण सध्या विभाजनामुळे सर्व शेतकरी कुटुंबे 90% अल्प भूधारक झाली आहेत शेतीची कामे येत नाही आणि पुरेसे व योग्य शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत याबाबत गांभीर्याने विचार होणे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
      ७/१२ दप्तरी आणेवारीतशीच पडून आहेत फाळणी नाही पिल्लू पडलेले नाही आणि गट नंबर सर्वे नंबर अद्याप एकत्र आहेत त्यामुळे खाते फोड नाही त्यातच गुंठेवारी शासकीय देवस्थान इनामी अशा नाना प्रकारच्या नोंदणी असल्यामुळे जमिनी या गोंधळामध्ये मोजणी नकाशा एकत्र नंबराचे आता अनेक तुकडे झाले आहेत मोजणी करणाऱ्यांची पूर्वीच्या सर्व गोंधळाच्या परिस्थितीत अनेक वाद निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे असंख्य शेत जमिनीच्या संबंधातील दहावी केसेस कोर्टामध्ये आहेत.
       पारंपारिक शेती करणाऱ्यांना व टक्के शेतकरी असून पूर्वीच्याच पद्धतीने शेती केली जाते त्यामुळे उत्पादन वाढत नाही याकरिता शासनाने सर्व जमिनीचे माती परीक्षण करून त्यांची नोंद सातबारा दप्तर कायमची करून ठेवावी व शेतकऱ्यांनी माती परीक्षण मधील सूचनेनुसार खाते व पिके घ्यावीत त्यामुळे योग्य जमिनीमध्ये योग्य पीक उत्पादन वाढण्यास मदत होईल या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू झाले आहेत.
         शेतीला उद्योग समजून बारामही विद्युत पुरवठा करणे आवश्यक आहे सध्या शेतकरी भार निर्माण आणि त्रस्त आहे हे चित्र बदललं पाहिजे.शेतीसाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्था करावी त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होऊ शकतो सध्या होणारा पुरवठा होल्टेज कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे त्यामुळे मोटर जळणे शॉर्ट होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून तड लावली पाहिजे.
प्रत्येकाला दुसऱ्याचे व्यवसाय चांगले फायद्याचे कमी कष्टाची आहेत असे नेहमी वाटत असते म्हणून हा एकच असा प्राणी आहे जो काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत गेला आहे समाजामध्ये येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी असतात करत असतो पण त्यातील आपण लागू होणाऱ्या कोणत्या गैरलागू कोणत्या याची प्रतवारी करत नाही. मी, कुटुंबाने आणि पूर्वजांनी व्यवसाय केली त्यामध्ये काही दम नाही प्रगती नाही प्रतिष्ठा नाही पैसा नाही त्यामुळे तुम्ही फक्त शिक्षण घ्यावं नोकऱ्या करा असा एक मतप्रवाह व्यवसायिक बाराबलूतेदार, शेतकरी यांच्यामध्ये निर्माण होत गेला आहे.
        आता कृषी औद्योगिक ता म्हणून शेती संबोधण्यास सुरुवात करावी त्यास लागणाऱ्या सेवा सुविधा द्याव्यात शेतकऱ्यांना अनुदान द्यावे शेतकऱ्यांना कर्ज कमी व्याजात उपलब्ध करून द्यावे. वेळेत परतफेड करणाऱ्यास जरूर व्याज मध्ये सूट द्यावी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांस बिघडविण्याची आळशी वृत्ती निर्माण करण्याची पद्धत चुकीची आहे. तसेच पुन्हा कधीही करू नये त्यांचा चांगल्या प्रामाणिक वेळेवर कर्ज भेटणार्‍या शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होत आहे व काळ सोकावत आहे.
         शेतकरी सुद्धा पाण्याच्या शिस्तबद्ध वापर करत नाहीत ती शिस्त लावणे गरजेचे आहे कारण चुकीच्या नियोजनामुळे जमिनी अति पाण्याच्या वापराने खराब होत आहेत. त्यांचे क्षारपड जमिनी मध्ये रूपांतर होत आहे त्यामुळे तुषार सिंचन ठिबक सिंचन सक्तीचे करावे लागले त्यामुळे पाण्याची बचत होईल. कष्ट कमी होईल पिके सुधारतील उत्पन्न वाढेल खर्च कमी लागतील आणि सध्या बागायत असणारी जमीन वाचलेल्या पाण्यामुळे चौपट बागायती करणे शक्य होईल, आणि वापरण्याचे शासनाने आचार संहिता उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी करावी, शेतीच्या पाण्यासाठी मीटर बसवावे.
      सध्या शेतीवर शेतकऱ्यांकडून सामुदायिक बहिष्कार टाकण्यात आला आहे की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीकडे यांची पाहण्याची दृष्टी पूर्णता बदली आहे शेती व्यवसाय हा त्रासदायक, काही प्राप्ती नसणारा कटकटीचा आहे. अशी भावना वाढल्यामुळे शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली देण्यास व शेतकरी असणारे मुलींची बाप तयार होत नाहीत ही शोकांतिका आहे. अशा सामाजिक अडचणीमुळे शेती साठी मनुष्यबळ निर्माण होण्यास मोठी कमतरता भासत आहे. कारण शेतीमध्ये सध्या 70% महिला  कामे करताना दिसतात उर्वरित 30% थोडी जास्त कष्टाची कामे पुरुष करतात, ही समस्या गंभीर असून त्यावर प्रबोधन करून मात करावी लागेल.   
        गाव कर्मचारी तलाठ्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन तिन्ही ऋतूमधील पिकांची नोंद ७/१२ दप्तरी करण्याची परंपरा आहे.
पूर्वी जमिनीच्या प्रतवारीनुसार सारा (फाळा) ठरवण्यात आला आहे. फाळ्यावरुण  सुद्धा बागायत जिरायत, कोरडवाहू जमिनी ओळखता येतात. त्यामुळे पिकण्याच्या सध्याची नोंदी हा फक्त अंदाजच आहे हे बदलण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाची मदत घेऊन सॅटलाईट (उपग्रह)  द्वारे नोंदी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे अंदाज न करता खऱ्या नोंदी होतील व शासनास योग्य माहिती मिळेल. आणि त्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल.
          आपल्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे शेतीची मशागत व्यवस्थित करता येत नाही विविध पिके शेजारी शेजारी असल्यामुळे परागीकरण चुकत आहे मशागत करताना अडचणी येत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्राच्या साह्याने मशागत करणे फारच अवघड बनली आहे या सर्वांवर पर्याय म्हणजे सार्वत्रिक शेती करणे त्यामुळे वरील समस्यांचे बऱ्यापैकी निवारण होईल असे वाटते.
        पिकानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये येथील पिकांवर आधारीत प्रक्रिया करणे उद्योग उभारण्यास शेतकऱ्यांचा विकास चांगला भाव मिळणार आहे वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे उद्योगांना सुद्धा कमी खर्चा मध्ये निर्मती करणे शक्य होणार आहे. शासनाने प्रक्रिया उद्योगात बरोबरच साठवणूक गोदाम व कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्यांस शेतमाल विक्री करणे सोयीचे होईल.
सध्या भारतभर मजूर टंचाई हा विषय फारच चर्चेत झाला आहे देशाची लोकसंख्या सुमारे 125 कोटींवर असताना मजुरांची अडचण आहे . हा एक विचित्र रोगच आहे या रोगांवर लस निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. भांगलण, कोळपणी, पेरणी, सुगी, खत पाणी यांसाठी सध्या कामे करणारी पिढी आहे ती शेवटचीच आहे. यापुढे अशीकामे करणारी माणसे मजूर उपलब्ध होणार नाहीत असे आजचे चित्र आहे येत्या दहा वर्षात ही पिढी संपणार आहे शेतासाठी बैल पळणे 90% बंद झाले असून, येत्या दहा वर्षात उर्वरित पशुपालन संपणार आहे संपूर्ण यांत्रिकरण आपल्या देशामध्ये शक्य झालेले नाही. त्यामुळे लहान शेतकरी अडचणी मध्ये येणार आहेत. ह्या सर्वांवर मात करण्याची झाल्यास काहीतरी नवीन शक्कल लढवते भाग आहे अन्यथा 75 टक्के जनता अडचणीमध्ये आल्याखेरीज राहणार नाही आता हा संशोधनाचा विषय झाला आहे.
        अल्पभूधारक मजूर शहरी दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी शासनाने अन्नधान्य रॉकेल पुरवठा योजना स्वतंत्र पासून राबवली आहे ही योजना अत्यंत चांगली व गरजू उपयुक्त आहे पण याचा टा फारच दिसत आहेत.
देशपातळीवर नियोजनाची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे देशातील एकूण शेती त्यातील बागायत जिरायत कोरडवाहू विभाग त्या भागांमध्ये पाण्याची अवस्था अपर्जन्यमानामध्ये करावयाची पाण्याची अवस्था सध्या जी पिके त्याचे प्रमाण त्याचा बाजारभाव विक्रीची ठिकाणी त्यास येणारा खर्च शेतकऱ्यास राहणारा नपा त्या भागातील मनुष्यबळ भारतात विक्री होणारे शेतमालावर आधारित पदार्थ परदेशामध्ये विक्री होणारे पदार्थ त्याची टक्केवारी सध्या शेतीमध्ये वापरात आलेले तंत्रज्ञान नवीन कोणत्या सुधारणा तंत्रज्ञानामध्ये आवश्यक आहेत त्या नियोजनानुसार खतपुरवठा संतुलित शेतीस प्रोत्साहन त्याची बाजारपेठ जैविक खते विद्युत पुरवठा पाणी साठवणूक कुशल अकुशल मजूर निर्मिती कृषी तज्ञ मनुष्यबळ निर्मिती अत्याधुनिक अवजारांची निर्मिती पारंपारिक अवजारांमध्ये सुधारणा बी बियाणे साठवण व शीतगृह उभारणी शेतीसाठी रस्ते इत्यादी नाना प्रकारची तयारी करून मग प्रत्येक शेतकऱ्याकडे त्यातील बागायती पिके काय आहेत व पुढे कोणती घ्यायची व नमूद केलेल्या कोण कोणत्या बाबींवर आवश्यकता आहे याची बाग नियोजन करून शास्त्रीय दृष्ट्या त्या भागांमध्ये कोणते पीक व कोणत्या शेतकऱ्याने घ्यायची क्षेत्रामध्ये घ्यायची याचे तंत्रज्ञान आणि कोणती व किती याबाबत निश्चित करून ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट तयार करावा त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांना जोडधंदा व प्रोत्साहन द्यावे. कृषी पर्यटन व्यवसायाला ही उत्तेजन द्यावे शहराचा ज्याप्रकारे केला जातो त्याप्रमाणे शेतीचा हा प्लॅन असावा.
         मनुष्यप्राणी समाधान सुख-समृद्धी यासाठी सतत धडपडत करत आहे. प्रत्येक बाबीन मंदिर समान शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण अज्ञात अयोग्य मार्गदर्शक जुन्या चालीरीती कर्मकांड जात-पात यामुळे त्याची लावायला तयार नाही समाधान हे श्रमामध्ये आहे आणि सर्वात उत्तम शरम हे शेतीमध्ये आहे हे जाणून घेऊन पुढच्या पिढीने काम केल्यास समाधान आणि सुख दूर नाही एक वेळ केवळ करून बघाच, मग सत्य काय ते कळेल श्रमामुळे शरीर व्यवस्थित राहील कृषी शक्ती वाढेल अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल ताजी सात्विक अन्न खाण्यास मिळेल गरजा कमी होतील व्यसना धिता जवळ येणार नाही आणि या सर्वांचा परिणाम सुख मध्ये रुपांतरीत होईल मग आपण म्हणू शकू कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार आणि उत्तम शेती .......
शेतीमधील समस्या मधून सध्या काही शेतकरी जिद्दीने मार्ग काढत आहेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!...

No comments:

Post a Comment