Wednesday, 24 October 2018

शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर

    प्रत्येक शेतकर्याची तक्रार आहे की शेती फायद्याची नाही. परंतु मी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतामध्ये कष्ट व मेहनत केली. नोकरी करण्यापेक्षा शेतात कष्ट करणे पसंत केले आहे आमची शेती पहिल्यांदा वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीने केली जात होती मी पहिल्यांदा पारंपरिक शेतीला वळण देऊन ऊस शेती निवडली. ना तालुका हा घाटमाथ्याशी असणारा भौगोलिक परिस्थितीनुसार असणारे हवामान आणि जास्त पाऊस पडणारा भाग आहे अति सृष्टीमुळे जमिनीची धूप होत असते. शेती परवडत नाही हे खरे असले तरी त्यामध्ये सुधारित तंत्राचा वापर करून ही शेती मला चांगले उत्पन्न कसे घेऊन देईल याच्याकडे माझे लक्ष लागले. बी उस पिकामध्ये आंतरपिके घेता येतील का याचा विचार करून उसाच्या चार फूट सरी मध्ये भुईमूग पालेभाजी यांसारखी पिके घेतली यातून मला खूप फायदा मिळाला.
           एवढ्यावरच समाधान न मानता शास्त्रीय आधार घेण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ संवाद साधला शेतकरी मासिक सेवा पत्र या कृषी संबंधित मासिकांमध्ये वाचन केले प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या यातून माझे मनोबल वाढले आणि मी उसाव्यतिरिक्त आले व हळद ही पिके घेण्याचे निश्चय केला त्यासाठी जमिनीची चांगली मशागत केली एक एकरावर आले पिकाची लागवड केली ट्रॅक्‍टरच्या साह्याने चार फूट बेड तयार करून त्यामध्ये सुकला निंबोळी पेंड करंजी पेंड सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीमध्ये मिसळून घेतली व १*१ फुटावरआल्याची लागवड केली. दीपक सिंचनचा वापर केला ठिबकद्वारे सुचला 19 19 19 मायक्रोला व बायोला विद्राव्य खते दिली गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी केली. पिकांची वाढ जोमदार होते हंगामानुसार मिरचीची लागवड केली ओल्या मिरचीचे उत्पादन अडीच टन तसेच आल्याचे 12 टन एकरी उत्पादन मला मिळाले. 
         हळद लागवडी मध्ये याच प्रकारे गादीवाफे तयार करून त्यावर 50 ग्रॅम वजनाचे खड्डे चार फूट बेडवर एक फुटावर लागवड करून घेतली. त्यास ठिबक सिंचनाने पाणी व विद्राव्य खते दिली वेळोवेळी मशागतीची कामे केली हळद काढणीनंतर स्वतः हळदीवर प्रक्रिया करून हळद पावडर तयार केली घरच्या घरी परिसरामध्ये अर्धा ते एक किलो वजनाची पॅकिंग करून हळद पावडर स्वतःच विक्री केली.
         केळी लागवड करताना आठ फूट सरी मध्ये चार फूट अंतरावर ती जी नाईन या जातीच्या टिश्यू कल्चर रोपांची एक एकरावर लागवड केली. वेळोवेळी कत्ती पाण्याचे व्यवस्थापन सांभाळल्याने बारा महिन्यात केळीचे पीक काढणीस आली यामधून एकरी 32 टन उत्पादन मिळाले. माझी शेती फायद्याची ठरल्याने माझ्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा केळीची पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
          ऊस पीक लागवड करताना चार फूट सरी मध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकाची लागवड केली होती त्यासाठी आरसीएफचे सुफला 15 15 15 आणि नीम कॉटेड उज्वला युरिया तसेच सुजला सारख्या विद्राव्य खतांचा वापर केला.मला एकरी उसाचे 80 टन उत्पादन मिळाले यामध्ये पालेभाज्या बटाटा भुईमूग यांसारखी आंतरपिके घेतल्यामुळे आर्थिक क्षेत्र वाढण्यास मदत मिळाली. ऊस पिकासाठी लागणारा खर्च हा मला अंतर्तिका मधूनच मिळाल्यामुळे ऊस लागवड फायद्याची ठरली शेतकऱ्यांना या बाबतीत मी मार्गदर्शन करत असतो विचार करून शेतीची व्यवस्थापन केल्यास शेती फायद्याची ही नक्कीच ठरते. हा माझा अनुभव आहे धन्यवाद.


No comments:

Post a Comment